मुंबई – राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकीची धामधूम आहे. सर्वच पक्ष आपापले उमेदवार जाहीर करत आहेत. काँग्रेसनेही आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेसने विधानपरिषद निवडणुकीसाठी भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे.
काँग्रेसकडून मोहन जोशी, सिद्धार्थ हत्ती अंबरे, हर्षवर्धन संकपाळ, संजय दत्त, सचिन सावंत, अतुल लोंढे यांच्या नावांची चर्चा होती. मात्र आता जगताप आणि हंडोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, राज्यात विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी येत्या २० जून रोजी निवडणूक होणार आहे.