मुंबई – वादग्रस्त ऑडिओ क्लिपमुळे पक्ष नेतृत्वाची नाराजी ओढवून घेतलेल्या माजी मंत्री रामदास कदम यांच्या विधान परिषदेतील सदस्य कार्यकाळ जानेवारीत संपत असल्याने त्यांच्या जागी कोणाला संधी मिळणार याबाबत सर्वानाच उत्सुकता लागलेली आहे. मात्र शिवसेनेत त्यासाठी काहींनी आताच मोर्चे बांधणी सुरू केली असून त्यात मुंबईतील काही विभाग प्रमुख तसेच आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेतील काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
मात्र त्या बाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. असे असले तरी या जागेसाठी आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तियाची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि तसे झाले तर यापुढे रामदास कदम यांची काय भूमिका असेल हे सुधा उत्सुकतेचे ठरणार आहे.