विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

मुंबई – राज्य शासनाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार आहे. आज सह्याद्री अतिथी गृहावर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब झाले असून २२ ते २९ डिसेंबर या कालावधीत अधिवेशन प्रस्तावित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते अजूनही रुग्णालयातच उपचार घेत आहेत. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला ते ऑनलाईन उपस्थित होते. दरम्यान, सोमवारी अधिवेशनास संदर्भात संसदीय समितीची बैठक होणार आहे. त्यावेळी अधिवेशनाची तारीख अंतिम केली जाईल.

गेल्या वर्षी देखील नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्यात आले होते. वर्षातून एक तरी अधिवेशन नागपुरात घेणे बंधनकारक आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशन कुठे आणि कधी घ्यायचे याबाबतही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय अपेक्षित होता. मुख्यमंत्र्यांची प्रकृती आणि अन्य कारणांमुळे शिवसेना अधिवेशन मुंबईत करण्यासाठी आग्रही होती. तर काँग्रेस मात्र नागपूरमध्ये अधिवेशन व्हावे यासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे.

Close Bitnami banner
Bitnami