संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 07 February 2023

विमानतळ कामासाठी दररोज स्फोट पनवेलच्या वहाळ गावात घरांना तडे

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

ग्रामस्थांच्या आंदोलनाचा इशारा

पनवेल – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सपाटीकरणाच्या कामासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर केल्या जात असलेल्या बोअर ब्लास्टिंगमुळे म्हणजेच स्फोटामुळे भूकंपासारखे हादरे बसत असल्याने पनवेल तालुक्यातील वहाळ गावातील सुमारे १०० घरांना तडे गेले आहेत.यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, बोअर ब्लास्टिंग बंद न केल्यास विमानतळाचे काम बंद करण्यासाठी ग्रामस्थांच्या माध्यमातून आंदोलन छेडण्याचा इशारा वहाळ ग्रामपंचायतीने सिडकोला दिला आहे.
या विमानतळाच्या उभारणीसाठी उलवा टेकडीवर सपाटीकरणाचे जोरदार काम सुरू आहे. डोंगर, टेकड्यांचे सपाटीकरण करण्यासाठी बोअर ब्लास्टिंगचा वापर केला जात आहे.यासाठी विमानतळाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीला पेट्रोलियम तथा विस्फोटक सुरक्षा विभागाने कंट्रोल ब्लॉस्ट करण्याच्या सूचनाही केल्या आहेत.मात्र,दररोज दुपारच्या वेळी बोअर ब्लास्टिंग करताना शासनाचे सर्वच नियम धाब्यावर बसवून क्षमतेपेक्षा अधिक स्फोटकांच्या प्रमाणाचा वापर ठेकेदार कंपनीकडून केला जात आहे.दररोज ब्लास्टिंगमुळे वहाळ गावातील सर्वच रहिवाशांच्या घरांना मोठ्या प्रमाणावर हादरे बसू लागले आहेत. एखाद्या भूकंपाप्रमाणे मोठ्या प्रमाणावर बसणाऱ्या हादऱ्यांमुळे ३०० घरांपैकी सुमारे १०० घरांना तडे गेल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य चेतन घरत यांनी दिली.वहाळ गावातील रहिवासी केसरीनाथ दापोळकर यांच्या आरसीसी घराच्या कॉलमला मोठ्या प्रमाणावर तडे गेले आहेत.घरातील तीनही भिंतीना तडे गेले असल्याने सातत्याने जीव मुठीत धरूनच घरात राहावे लागत आहे.भीतीमुळे लहान मुलांना दुसऱ्या घरी दुसऱ्या घरी धाडावे लागत असल्याची माहिती असल्याची माहिती केसरीनाथ दापोळकर यांनी दिली.
तसेच आशाबाई दापोळकर या विधवेच्या घरातील घर,जिना,लाद्या, सिलिंगला ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर तडे गेले आहेत.या स्फोटाच्या प्रकरणाबाबत सिडकोच्या एअरपोर्ट विभाग व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी करून बोअर ब्लास्टिंग बंद करावे अन्यथा विमानतळाचे कामकाज बंद करण्यासाठी कामकाज बंद करण्यासाठी जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला असल्याची माहिती वहाळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पूजा पाटील यांनी दिली. दरम्यान,प्रांताधिकारी राहुल मुंडके यांनी ही बाब गंभीर असल्याने या बोअर ब्लास्टिंगची चौकशी करून
संबंधितांवर कारवाई करण्यासाठी तहसीलदारांना सूचना दिल्या असल्याचे सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami