कीव्ह – युक्रेन आणि रशिया यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. त्यामुळे तेथे तणाव आहे. अशा परिस्थितीत युक्रेनमध्ये अडकलेल्या अनेक विद्यार्थ्यांना भारतात परत यायचे आहे. परंतु युक्रेन-भारत दरम्यान केवळ चार्टर्ड विमान सेवा सुरू असल्यामुळे आणि त्याचे भाडे ४५ टक्के जास्त असल्याने त्यांना भारतात परतण्यास अडचणी येत आहेत. बिहारमधील काही विद्यार्थ्यांनी ही अडचण पालकांना सांगितली. त्यामुळे पालकही चिंतेत आहेत.
बिहारच्या चंपारण आणि बोधगया येथील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. युक्रेनमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांना भारतात परत यायचे आहे. मात्र भारत-युक्रेन दरम्यान केवळ रेग्युलर विमानसेवा सुरू आहे. ही चार्टर्ड विमाने आहेत. त्यांचे भाडे ५० हजार रुपये आहे. सामान्य विमानाचे भाडे ३० ते ३५ हजार असते. एवढे पैसे विद्यार्थ्यांकडे नाहीत. त्यामुळे त्यांना भारतात परतण्यात अडचणी येत आहेत. २८ फेब्रुवारीपासून कीव ते नवी दिल्ली या विमान तिकिटाच्या दरात ४५ टक्के वाढ झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत, असे मत पालकांनी व्यक्त केले.