संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 21 May 2022

विराजस-शिवानीच्या लग्नाचे फोटो पाहिले का?

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

मुंबई – ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा लेक विराजस कुलकर्णी आणि रांगोळे कुटुंबाची लाडकी कन्या शिवानी रांगोळे अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर लग्नबंधनात अडकले होते. नुकतंच त्यांच्या लग्नाचं शाही रिसेप्शन पार पडलं. या शाही रिसेप्शनचे फोटो समोर आले आहेत. या रिसेप्शनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विशेष उपस्थिती होती.

विराजास आणि शिवानीने ३ मे रोजी पुण्यात लग्नगाठ बांधली. या सोहळ्यात मोजकेच पाहुणे उपस्थित होते. त्यामुळे लग्नानंतर काही दिवसांनी रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं. लग्नात या दोघांनी साऊथ स्टाईल पोशाख केला होता. सोशल मीडियावर त्याची खूप चर्चा झाली. आता रिसेप्शनसाठी शिवानीने लेहंगा आणि विराजसने शेरवानी परिधान केली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami