संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 21 May 2022

विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदही सोडले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

नवी दिल्ली – प्रसिद्ध क्रिकेटर विराट कोहलीने आज मोठा निर्णय घेतला आहे. त्याने आधीच टी २० आणि एकदिवसीय कर्णधारपद सोडले होते. आता त्याने कसोटी कर्णधारपदही सोडले आहे. शनिवारी विराट कोहलीने सोशल मीडियावरुन कसोटी कर्णधारपद सोडल्याची माहिती दिली.

गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली आणि बीसीसीआय यांच्यामधील वाद सुरु होता. टी20 कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहली आणि बीसीसीआय असा वाद सुरु झाला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 58.82 टक्के सामने जिंकले आहेत. विराटच्या नेतृत्वावात 68 पैकी 40 सामने जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघाने केलाय. विराट भारताचा सर्वाधिक यशस्वी कसोटी कर्णधार आहे.

नुकत्याच दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला 2-1 च्या फरकाने पराभवाला सामोरं जावं लागले होतं. त्यानंतर विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. धोनीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहलीकडे धुरा सोपवण्यात आली होती. विराट कोहलीने भारतीय संघाला अनेक अशक्यप्राय विजय मिळवून दिले आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने विदेशात विजय मिळवले आहेत. विराट कोहली भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने अनेक विजय संपादन केले आहेत.  

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami