संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

विरारमध्ये पुन्हा दिवसाढवळ्या गोळीबार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

विरार – विरारमध्ये गोळीबाराचे सत्र काही केल्या थांबत नाही. काल, सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विरारच्या बरफपाडा भागात गोळीबाराची घटना घडली. या हल्ल्यात संबंधित गंभीर जखमी झाला. मागील तीन दिवसात गोळीबाराची ही दुसरी घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आसाराम राठोड असे हल्ला झालेल्या ५० वर्षीय व्यक्तीचे नाव असून ते कंत्राटदार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बरफपाडा याठिकाणी दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी राठोड यांच्या पोटात दोन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात राठोड गंभीर जखमी झाले. त्यानंतर आसपासच्या नागरिकांनी त्यांना तातडीने संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. आसाराम राठोड यांचा प्रेमविवाह झाला आहे. या प्रेमविवाहाच्या रागातून त्यांच्यावर हल्ला झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, एका वर्षापूर्वीही आसाराम राठोड यांच्यावर गोळीबार झाला होता. या गोळीबारातून ते थोडक्यात बचावले होते. मात्र एकदा जीवदान मिळाल्यानंतर काल पाच महिन्यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर गोळीबार झाला. त्यामुळे हा हल्ला पूर्ववैमन्यस्यातून झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. तसेच तीन दिवसांपूर्वी शनिवारी विरार परिसरात समय चौहान नावाच्या एका तरुणाची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी समयवर चार गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात समय रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यूमुखी पडला होता. ही घटना ताजी असतानाच सोमवारी सायंकाळी विरार परिसरात गोळीबाराची आणखी एक घटना उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami