मुंबई:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्यात आले. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मुंबईतील विलेपार्ले येथे ठाकरे गटाकडून जोरादर बॅनरबाजी करण्यात आली आहे. धनुष्यबाण रावणाच्या हातात पण गेला होता. पण त्याची प्रवृत्ति निच होती. त्यामुळे अंत निश्चित विजय सत्याचाच होणार. चला निष्ठावंत शिवसैनिकांनो संघर्षाला तयार व्हा! असे लिहिण्यात आले होता. सध्या या बॅनरची सोशल मिडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. या बॅनरच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे.