संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 06 February 2023

विवाहबाह्य संबंध ठेवल्यास
इंडोनेशियात १ वर्षाची शिक्षा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

जकार्ता – इंडोनेशिया सरकारने देशातील विवाहपूर्व शारीरिक संबंधांच्या घटनांना आळा घालण्यासाठी नवीन कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन कायद्यानुसार विवाहपूर्व किंवा विवाहबाह्य शारीरिक संबंध ठेवल्यास एक वर्ष कारावास आणि दंड अशी शिक्षा आहे. या कायद्याचा मसुदा तयार असून पुढील वर्षाच्या सुरूवातीला हा नवा कायदा लागू होण्याची शक्यता आहे.
या नव्या कायद्यानुसार, इंडोनेशियात राहणाऱ्या कोणत्याही नागरिकाने विवाहपूर्व किंवा विवाहबाह्य शारीरिक संबंध ठेवल्यास १ वर्ष कारावास आणि दंड अशी शिक्षा होणार आहे. तसेच हे प्रकरण न्यायालयात दाखल होण्यापूर्वी तक्रार परत घेण्याची तरतुदही या कायद्यात करण्यात आली आहे.दरम्यान,
”इंडोनेशियातील मुल्यांवर आधारीत कायदा अस्तित्त्वात येण्याचा आम्हाला अभिमान आहे”, असे इंडोनेशियाचे कायद्यामंत्री एडवर्ड उमर शरिफ हियरीज यांनी म्हटले आहे. तीन वर्षांपूर्वी इंडोनेशिया सरकारने अवैध शारीरिक संबंधांवर बंदी घालणारा कायदा लागू करण्याचा प्रयत्न केला होता.मात्र,त्यावेळी संपूर्ण इंडोनेशियात या कायद्याविरोधात प्रदर्शन करण्यात आले होते.सध्या महिला,अल्पसंख्यक आणि एलजीबीटीक्यू समुदायांमध्ये भेदभाव करणारे शेकडो कायदे इंडोनेशियात लागू केले आहेत.अशातच हा नवा कायदा लागू झाल्यानंतर हा कायदा इंडोनेशियातील नागरिकांबरोबरच इथे राहणाऱ्या विदेशी नागरिकांनाही लागू होणार आहे.या कायद्यामुळे इंडोनेशियाची प्रतिमा जगभरात खराब होईल, अशी चिंताही अनेकांनी व्यक्त केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami