संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

वीजबिल भरा नाहीतर दिवाळी अंधारात! महावितरणचा इशारा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नाशिक : नाशिककरांनी चालू महिन्याचे किंवा थकीत वीजबील भरले नाही तर ऐन दिवाळीत घरात अंधार होऊ शकतो.कारण महावितरणाने बिल थकवणाऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याचा इशारा दिला आहे.विशेष म्हणजे दिवाळीत नाशिकमध्ये अखंड वीजपुरवठा करावा अशी सूचना नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले आहे.मात्र महावितरण आपल्या निर्णयावर ठाम आहे.

आजपासून दिवाळीला सुरुवात झाली आहे. त्यातच महावितरणाने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून वीजधारकांना शुभेच्छा दिल्या आहेत.त्याचबरोबर कारवाईच्या इशाऱ्याचा शॉक देण्यात आला आहे.या शुभेच्छांच्या पोस्टमध्ये एक ओळ दिली आहे की, तुम्ही वीज बिल भरा अन्यथा तुमचे कनेक्शन कापण्यात येईल,अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तातडीच्या सूचना आहेत. गेल्या दहा दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थित जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली होती. या बैठकीत नाशिककरांचा दिवाळीच्या काळात कोणाचाही वीजपुरवठा खंडीत होता कामा नये अशी सूचना देण्यात आली होती.मात्र महावितरण त्यांच्या निर्णयावर ठाम असून नाशिककर संतप्त झाले आहेत. महावितरणाला शुभेच्छासोबत असा वीजखंडीत करण्याचा इशारा देण्याची गरज नव्हती,अशी प्रतिक्रिया संतप्त नाशिककर देत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami