संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

वेदांता कंपनीच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो शिवसेनेकडून ट्विट

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मागील काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्षाचे कारण ठरलेल्या वेदांता- फॉक्सकॉन कंपनीच्या प्रकल्पाचा वाद आणखीनच चिघळला आहे. एमआयडीसीच्या पुण्यातील प्रादेशिक अधिकाऱ्यांनी वेदांता प्रकल्पाबाबत कोणता करारच झाला नव्हता,असे सांगत महाविकास आघाडीच्या नेत्यांची कोंडी केली होती. मात्र त्यानंतर आता शिवसेनेने यासंदर्भातील काही पुरावे बाहेर काढून शिंदे-फडणवीस सरकारची उलट कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेच्या ट्विटर हँडलवरून यासंदर्भात काही छायाचित्रे ट्विट केली आहेत.यामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट केलेल्या माहितीचा दाखला देण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेदांता कंपनीच्या शिष्टमंडळाची भेट घेतल्याचा फोटो मुख्यमंत्री कार्यालयाच्या
ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला होता. तसेच एमआयडीसीच्या जर्नलमध्येही या प्रकल्पासंदर्भात माहिती छापून आली होती.तो फोटोचा शिवसेनेकडून ट्विट करत काही मुख्यमंत्र्यांना काही सवाल केले आहेत.
मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एवढं खोटं का बोलले? हा महाराष्ट्राशी धोका आहे, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. दहीहंडी खेळाचा दर्जा देण्यासारखी ही फक्त घोषणा होती का ? असा सवालही शिवसेनेने शिंदे सरकारला केली आहे.यावर आता भाजप आणि शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami