संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

वेरूळ लेण्यांसमोरचा जैन कीर्ती स्तंभ हटवण्याची पुरातत्व विभागाची मागणी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

औरंगाबाद- जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर असलेला जैन कीर्ती स्तंभ हटवण्याची मागणी पुरातत्व विभागाने केली. हा स्तंभ पूर्णपणे अनाधिकृत असून जर, लेणीमध्ये बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मांच्या लेणी असतील तर एकाच धर्माचे प्रतीक असणारा स्तंभ का? असा प्रश्न देखील पुरातत्त्व विभागाने विचारला आहे. तर हा कीर्तिस्तंभ हलवू नये अशी मागणी भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थसंरक्षणी महासभा यांनी केली आहे.

जगप्रसिद्ध वेरूळच्या लेणी मुख्य प्रवेशद्वारावर भगवान महावीर यांच्या 2500 व्या निर्वाण महोत्सवानिमित्त, 48 वर्षांपूर्वी उभारलेला जैन कीर्ती स्तंभ आता येथून हलणार आहे. त्या ठिकाणी नवीन स्तंभाच्या जागेवर विश्व धरोहर एलोरा गुफाएं असे देवनागरी आणि इंग्रजीत वर्ल्ड हेरिटेज स्टोन लिहिलेला नामफलक बसवला जाईल. तीन धर्मांच्या लेण्यांमध्ये एकाच धर्माचे प्रतिक का? असा सवाल विचारला जात असून यामुळे ट्रॅफिकला अडथळा येत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा स्तंभ इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचा देखील प्रस्ताव पुरातत्व विभागाने दिला आहे. मात्र हा कीर्तिस्तंभ हलवू नये अशी मागणी भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थसंरक्षणी महासभा यांनी केली आहे. महावीर कीर्तिस्तंभ सत्य,अहिंसेचा संदेश देतो. यातून एका विशिष्ट धर्माचा प्रसार होत नाही. तो तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांच्या संमतीने बसवण्यात आला होता. पुरातत्त्व खात्याने तो येथे कायम ठेवावा. त्याला या ठिकाणाहून स्थलांतरित करण्यास आम्ही विरोध करू अशी भूमिका भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थसंरक्षणी महासभा यांनी घेतली आहे. ’जिओ और जिने दो’ असा संदेश या कीर्तीस्तंभावर आहे. दोन वर्षांपूर्वी वेरूळच्या श्री पार्श्वनाथ ब्रह्मचर्याश्रम जैन गुरुकुलच्या वतीने 8 लाख रुपये खर्च करून स्तंभाचे सुशोभीकरण करण्यात आले. त्यावर ग्रॅनाइट आणि स्तंभाच्या शिखरावर वेळ आणि तापमान सांगणारे घड्याळ बसवण्यात आले होते. हा स्तंभ अहिंसा, प्रेम, क्षमा, करुणा याचे प्रतीक असल्याचे येथे नमूद आहे. या स्तंभाच्या आजुबाजूला छोट्या छोट्या दुकानदारांनी अतिक्रमणनही केले. त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो. केवळ एवढेच नाही तर लेणी बाजूचा असलेला रस्ताही हटवण्याची मागणी पुरातत्व विभागाने केली आहे. मात्र मुळातच हा स्तंभ हटवण्याचा विचार सुरू होताच त्याला विरोधही व्हायला सुरू झाला. त्यामुळे पुरातत्व विभागाच्या वेरूळ लेणीच्या सुशोभीकरणाच्या योजनेचे पुढे काय होणार हा प्रश्न आता उपस्थिती झाला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami