संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 18 August 2022

वेस्ट इंडिजविरुद्ध भारताचा टी-२० संघ जाहीर! कोहलीचा समावेश नाही

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात २९ जुलैपासून सुरू होणाऱ्या ५ सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा झाली. त्यात विराट कोहलीला डच्चू दिला आहे. रोहित शर्मा याची संघाच्या कर्णधारपदी निवड केली असून १८ खेळाडूंचा त्यात समावेश आहे. के. एल. राहुल आणि कुलदीप यादव यांचे संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. तंदुरुस्ती चाचणीनंतर त्यांचा संघात समावेश होऊ शकतो, अशी माहिती बीसीसीआयने दिली.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात या महिनाअखेरीपासून ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. त्यातील पहिला सामना २९ जुलैला, दुसरा १ ऑगस्ट, तिसरा २ ऑगस्टला, चौथा ६ ऑगस्ट आणि पाचवा ७ ऑगस्टला होणार आहे. मालिकेतील पहिले ३ सामने कॅरेबियात, तर २ सामने लॉन्डरहिल आणि फ्लोरीडा येथे होणार आहेत. या संघात विराटला स्थान मिळालेले नाही. एक दिवसीय संघातून त्याला विश्रांती दिली होती. जसप्रीत बुमराह आणि युजवेंद्र चहल यांनाही विश्रांती दिली आहे. त्यांचाही संघात समावेश नाही.

या दौऱ्यासाठी जाहीर झालेला संघ पुढील प्रमाणेः- रोहित शर्मा (कर्णधार), ईशांत किशन, के. एल. राहुल, सुर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर. अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, अवेश खान, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंह. यातील के. एल. राहुल आणि कुलदीप यादव यांचा संघातील समावेश त्यांच्या तंदुरुस्तीवर अवलंबून आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami