नवी दिल्ली – इंडियन ऑईलने आज गॅस सिलिंडरचे सुधारित दर जाहीर केले. त्यात १४.२ किलोच्या घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. मात्र १९ किलोच्या व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात केल्याने तो १३५ रुपयांनी स्वस्त झाला. त्यामुळे व्यवसायिक गॅस सिलिंडरधारकांना थोडा दिलासा मिळाला आहे. मुंबईत व्यवसायिक गॅस सिलिंडर २,३०६ रुपयांवरून २,१७१.५० इतका झाला. गेल्या महिन्यात तो १०० रुपयांनी महागला होता.
इंडियन ऑईलने नेहमीप्रमाणे आज गॅस सिलिंडरचे नवे दर जाहीर केले. त्यात १९ किलोचा व्यवसायिक गॅस १३५ रुपयांनी स्वस्त झाला. त्यामुळे मुंबईत हा सिलिंडर २,१७१.५०, तर दिल्लीत २,२१९ रुपयांना मिळणार आहे. मेमध्ये घरगुती गॅस सिलिंडर दोन वेळा महागला होता. मात्र यावेळी त्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.