संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 19 January 2022

व्यापाऱ्यांनो, पाटीचा खर्च जास्त की काचेचा? मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्यांना मनसेचा इशारा

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

मुंबई – राज्यात दुकानांवरच्या पाट्या मराठी ठळक अक्षरात लावण्याच्या आदेशावरुन आता राजकारण सुरु झालं आहे.  राज्य मंत्रिमंडळाने राज्यातील सर्व दुकानांवर आता मराठीत ठळक अक्षरात दुकानांची नावे लिहिण्याचे आदेश जारी केले आहेत. मात्र या आदेशांना मुंबई ट्रेडर्स संघटनेचे अध्यक्ष विरेश शहा यांनी विरोध करत आदेशांचं पालन करणार नसल्याचे म्हटले आहे. यावरुन आता मनसेनेही मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना इशारा दिला आहे. ज्यांना विरोध करायचा आहे त्यांना एकच विचारायचे आहे की, दुकानाची पाटी बदलण्याचा खर्च अधिक आहे की दुकानाच्या फुटलेल्या काचा बदलण्याचा खर्च अधिक आहे. याचा विचार विरोध करायच्या आधी जरुर करावा, असा थेट इशारा संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

संदीप देशपांडे यांनी म्हटले की सर्व व्यापाऱ्यांचा याला विरोध नाही, बोटावर मोजता येणारे काही आहेत, जी जाणीवपूर्वक याला विरोध करत आहेत. अशा व्यापाऱ्यांना इतकेच सांगायचे आहे की तुम्ही महाराष्ट्रात रहाता, महाराष्ट्राच्या सुख-सुविधा वापरता, महाराष्ट्राची जमीन वापरता, मराठी माणसांसोबत व्यापार करता, महाराष्ट्राची वीज वापरता, महाराष्ट्राचं पाणी वापरता, इथे तुम्ही मराठी भाषेला विरोध करु शकत नाही, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. राज्य सरकार या निर्णयाची अमलबजावणी कधी करत हे आम्ही बघू, सरकारला काही दिवस देत आहोत, असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami