नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर गगनाला भिडला आहे. असे असतानाही अर्थसंकल्पाच्या दुसऱ्याच दिवशी १९ किलोच्या कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात तेल कंपन्यांनी ९१ रुपयांची कपात केली आहे. यामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. पाच राज्यांमध्ये निवडणुका असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली असतानाही भारतीय तेल कंपन्यांनी इंधन दरात कोणताही बदल केलेला नाही. मात्र आज कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात ९१ रुपयांची कपात केली. त्यामुळे मुंबईत १९ किलोचा कमर्शियल गॅस सिलिंडर १,८५७ रुपये झाला आहे. यापूर्वी तो १,९४८ रुपयांना होता. दिल्लीत हा गॅस सिलिंडर १,९०७ रुपये झाला आहे. यापूर्वी तो १,९९८ रुपये होता. चेन्नईत २०४० आणि कोलकत्यात १,९८७ रुपये कमर्शियल गॅस सिलिंडर झाला आहे