संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

व्हिस्टा डोम कोचसह “तेजस’ची १ नोव्हेंबरपासून मडगावपर्यंत सेवा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते करमाळी तेजस एक्सप्रेसला उद्या १५ सप्टेंबरपासून व्हिस्टा डोमचा एक डबा जोडला जाणार आहे. याशिवाय १ नोव्हेंबरपासून ती मडगावपर्यंत धावणार आहे. त्यामुळे तेथील प्रवाशांनाही जलद आणि आरामदायी प्रवासाची सेवा मिळणार आहे.
मुंबई-करमाळी तेजस एक्सप्रेस मडगाव जंक्शनपर्यंत वाढवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. १ नोव्हेंबरपासून दर मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सकाळी ५.५५ वाजता ही ट्रेन सुटेल. त्यानंतर मडगाव जंक्शनला त्याच दिवशी दुपारी २.४० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात मडगाव जंक्शन येथून मुंबई सीएसएमटीसाठी ही ट्रेन ३.१५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.५५ वाजता मुंबईला पोहोचेल. मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी ही ट्रेन धावणार आहे. दादर, ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ, करमाळी या रेल्वे स्थानकांवर ती थांबेल. एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार असे डबे या ट्रेनला असतील. १५ सप्टेंबरपासून व्हिस्टा डोम कोच ट्रेनला जोडला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना निसर्गाचाही आनंद लुटता येईल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami