व्हॅटिकन सिटी- जगातील सर्वात छोटा देश म्हणून ओळखल्या जाणार्या व्हॅटिकन सिटी या देशाच्या अधिकृत सरकारी वेबसाइट काल बुधवारी अनोळखी हॅकर्सनी हॅक केल्याने ती काही काळ बंद पडली ,अशी माहिती होली सीने सांगितले.
व्हॅटिकन सिटीचे प्रवक्ते मॅटेओ ब्रेनी यांनी सांगितले की, या वेबसाइटवर झालेल्या गंभीर स्वरूपाच्या हल्ल्याचा तांत्रिक तपास सुरू आहे.युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्याबाबत पोप फ्रान्सिस यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर दुसर्याच दिवशी ही वेबसाइट हॅक करण्यात आली आहे.पोप यांनी जेसुइट मासिकाला दिलेल्या मुलाखतीत चेचण्या आणि रशियामधील इतर वांशिक अल्पसंख्याकांवर क्रुरतासदृश वर्तनाबाबत वक्तव्य केले होते.