मुंबई – गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झालं. संपूर्ण जगात गानकोकिळा म्हणून ख्याती मिळवलेल्या लता मंगेशकर यांनी त्यांच्या अखेरच्या दिवसांतही गाण्यालाच प्राधान्य दिलं होतं. व्हेंटिलेटरवर असताना लता मंगेशकर यांनी इअऱ्फोन मागवले होते अशी माहिती व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट हरिश भीमाणी यांनी सांगितली. तसेच, त्यांच्या शेवटच्या दिवसांत त्यांनी दिनानाथ मंगेशकर यांची गाणी ऐकली असंही त्यांनी सांगितलं. आजतक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
लता मंगेशकर यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांनी हरिश भीमाणी यांना सांगितले की लतादिदी अखेरच्या दिवसांत वडिल दिनानाथ मंगेशकर आठवण काढत होत्या. त्या दीनानाथ मंगेशकर यांचा खूप आदर करत असत. दिनानाथ मंगेशकर हे नाट्यसंगीत गायक होते. त्यांची नाट्यगीतं लतादीदींनी ऐकली, अशी माहिती हरिश भीमाणी यांनी दिली. तसेच, त्यांना मास्क हटवण्यास मनाई करण्यात आली होती. तरीही त्या मास्क काढून गाणं गुणगुणत होत्या, असं हृदयनाथ मंगेशकर यांनी हरीश भीमाणींना सांगितलं.
हरिश भीमाणी यांना लता मंगेशकर यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगतिलं की आपल्या शेवटच्या दिवसात लतादीदी या वडील दिनानाथ मंगेशकर यांची आठवण काढत होत्या. दिनानाथ मंगेशकर हे नाट्यसंगीत गायक होते. लता मंगेशकर यांनी त्यांच्या वडिलांच्या रेकॉर्डिंग मागवल्या होत्या. ही नाट्यगीतं ऐकण्याचा प्रयत्न लतादीदी करत होत्या. मृत्यूच्या दोन दिवस आधी लतादीदींनी इयरफोन मागवला होता.लता मंगेशकर या वडिलांना गुरू मानत होत्या आणि त्यांचा खूप आदर करत होत्या.