मुंबई- अखिल भारतीय नाट्य परिषदेची एक तातडीची नियामक मंडळ सभा नुकतीच दादरमधील राजश्री शाहू महाराज सभागृहात पार पडली.परिषदेचे प्रभारी अध्यक्ष नरेश गडेकर हे या सभेच्या अध्यक्षस्थानी होते.यावेळी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला.नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे हे परिषदेच्या घटनेप्रमाणे कामकाज करीत नसल्याने त्यांचे प्रमुख कार्यवाह पदाचे सर्व अधिकार या सभेने काढून घेण्याचा निर्णय यावेळी घेतला. दरम्यान,परिषदेच्या नियामक मंडळाची मुदत मार्च २०२३ मध्ये संपत असल्याने त्यापूर्वी निवडणुका घेण्याचे या सभेत ठरविण्यात आले.
या सभेत प्रभारी अध्यक्ष नरेश गडेकर यांची २०२३ ते २०१८ ते २०२३ या उर्वरित कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली.तसेच शरद पोंक्षे यांचे सर्व अधिकार काढल्यानंतर हे अधिकार सहकार्यवाह यांना देण्यात आले. तसेच आगामी निवडणुकीसाठी मतदार यादी व घटनेप्रमाणे निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.प्रमुख निवडणूक अधिकारी नियुक्तीबाबतही या सभेत चर्चा करण्यात आली.निवडणूक अधिकारी नियुक्तीबाबत पाच सदस्सीय समिती गठीत करण्यात आली आहे.त्यामध्ये भाऊसाहेब भोईर,सविता मालपेकर,सुनील महाजन, विजय कदम,शामानाथ पुंडे आदींचा समावेश असून ही समिती पाच दिवसांत निवडणूक अधिकारी यांचे नाव जाहीर करेल.तसेच येत्या काही दिवसांत सर्वसाधारण सभा घेण्यात येईल.असे या सभेत सर्वानुमते ठरविण्यात आले.
प्रभारी अध्यक्ष नरेश गडेकर हे या सभेची तारीख आणि वेळ निशित करणार आहेत.त्याचप्रमाणे कोरोना काळात सभासद झालेल्या सर्व सभासदांची माहिती घेऊन त्यांना सभासदत्व देण्याबाबत पुढील सभेत निर्णय घेण्यात येणार आहे.