संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

शाळांना दिवाळीनिमित्त 18 दिवस असणार सुट्टी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सोलापूर- दिवाळीची सुरुवात 21 ऑक्टोबरपासून होत आहे. त्यानिमित्ताने शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांना 20 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी असणार आहे. 8 नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती असून त्या दिवशीही सुट्टी असेल. 9 नोव्हेंबरपासून शाळा पुन्हा पूर्ववत सुरू होतील, असे प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

दरवर्षी शाळांना दिवाळीनिमित्त सुट्टी असते. 21 ऑक्टोबरला वसुबारस असून 22 ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे. दिवाळीच्या निमित्ताने यंदा 18 दिवस शाळा बंद राहतील. कोरोनामुळे शाळा दोन वर्षांपासून बंद राहिल्याने दिवाळी सुट्टीत देखील विद्यार्थ्यांवर शिक्षकांचे लक्ष असणार आहे. पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांना अंकगणित, अक्षर ओळख व्हावी हा त्यामागील हेतू असणार आहे. दोन वर्षे शाळा बंद राहिल्याने असंख्य विद्यार्थी अभ्यासात अजूनही पिछाडीवर आहेत. ऑनलाइन शिक्षण घेता न आलेल्यांना विशेषत: सर्वसामान्य कुटुंबातील मुलांची गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला जात आहे. दिवाळी सुट्टीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयावर निबंध लिहिणे, वाचन सराव, अंक व अक्षर ओळख याकडे लक्ष द्यायचे आहे. शिक्षकांना त्याची सक्ती नाही, पण स्वेच्छेने शिक्षकांनी ते काम करायचे आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami