संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

शाळांमध्ये भगवद्‍गीतेचे पठण होणार नसेल तर फतवा ए आलमगिरी पठण करायचे का?

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत भगवद् गीता पठणाच्या ठरावाची सूचना भाजप नगरसेविका योगिता कोळी यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना केली होती. परंतु त्यावर लगेचच समाजवादी पक्षाकडून विरोध केला गेला. आपल्याच देशात श्रीमद भगवद् गीतेच्या पठणाला विरोध होतो हे दुर्दैवी आहे. आपल्या शाळांमध्ये भगवद्‍गीतेचे पठण होणार नसेल तर फतवा ए आलमगिरी पठण करायचे का? असा सवाल करत भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महानगरपालिकेच्या शाळेत भगवत गीता पठाणाच्या ठरावाची सूचना महापौरांना भाजपच्या योगीनाथ आई कोळी यांनी केली होती. परंतु त्यावर लगेच समाजवादी पार्टीकडून आक्षेप आणि विरोध केला जातोय खरं तर हे दुर्दैवी आहे. ज्याप्रमाणे भारतीय संस्कृतीतील योगज्ञान जगाने स्वीकारले, अंगीकारले. त्यात कोणत्याही धर्माचा अडसर नाही. त्याचप्रमाणे जगभरातील विद्यापीठे, तत्त्ववेत्ते आणि विचारवंत तत्त्वज्ञानाच्या अभ्यासात भगवदगीता या ग्रंथाला अनन्य साधारण महत्व देतात. अमेरिकेतील सेंटोन हॉल युनिव्हर्सिटीत तर भगवद्‍गीता आणि मॅनेजमेंट अशा पद्धतीचे कोर्सेसही शिकवले जात आहेत. संपूर्ण जग तत्त्वज्ञान ते कॉर्पोरेट अशा सर्वच क्षेत्रात भगवद्‍गीतेचे महत्त्व मान्य करत आहे. कारण हा ग्रंथ मानवी कल्याणाचा मार्ग आहे. भगवद्‍गीता पठणाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडेल यात कुठलीही शंका असण्याचे कारण नाही. परंतु आपल्याच देशात गीता पठणाला विरोध होत असेल तर मग विद्यार्थ्यांना औरंगजेबाचे फतवा ए आलमगिरीचे पठण करायला लावायचे का? जेणेकरून मुक्तार अन्सारी यांच्यासारखी माणसे यांना घरोघरी जन्माला घालता येतील.

मला खात्री आहे कि हिंदू हृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र म्हणून अशा भगवद्‍गीता पठणाला होणार्‍या विरोधाच्या दबावापुढे आपण झुकणार नाहीत. आणि योगिनी कोळी यांची सूचना मान्य करण्यास आपण पक्षप्रमुख म्हणून लगेचच निर्देशीत कराल ही आशा बाळगतो.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami