संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

शाळा कॉलेजातील विद्यार्थिनींच्या हिजाब प्रकरणी उद्या उच्च न्यायालयात सुनावणी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

उडपी – हिजाब घातलेल्या विद्यार्थिनींना महाविद्यालयात प्रवेश नाकारण्याचे प्रकरण चांगलेच तापले होते. कॉंग्रेसने त्या विरोधात आंदोलन केले होते. त्यामुळे आता हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले आहे. त्यावर उद्या सुनावणी होणार आहे.

कर्नाटकातील उडिपी येथील कुंदापूर परिसरात असलेल्या पियू महाविद्यालयात हिजाब घातलेल्या विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यात आला होता. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी हिजाब घातलेल्या मुलींना प्रवेशद्वारात अडवून घरचा रस्ता दाखवला होता. त्याविरुद्ध मोठे राजकीय वादळ उठले होते. कॉंग्रेसने आंदोलन केले होते. सरस्वतीच्या मंदिरात भेदभाव कसला असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता. तर हिजाब घातल्यामुळे ज्या मुलींना महाविद्यालयात प्रवेश नाकारला होता, त्यांनी या प्रकरणी उच्च न्यायलयात धाव घेतली असून, त्यांच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी आहे. दरम्यान या प्रकरणामुळे महाविद्यालय प्रशासन कोंडीत सापडले होते. अखेर त्यावर तोडगा म्हणून हिजाब घातलेल्या मुलीना महाविद्यालयात सशर्त परवानगी देण्याची तयारी महाविद्यालयांनी दर्शवली आहे.

उडिपी येथील महाविद्यालयांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून हिजाब घातलेल्या विद्यार्थीनीना प्रवेश नाकारला जातोय. कारण मुस्लीम विद्यार्थिनी हिजाब घालून आल्या तर हिंदू विद्यार्थिनी भगवे दुप्पते घेऊन शाळेत येतील अशी भूमिका हिंदू संघटनांनी घेतली होती . तर प्रत्येक विध्यार्थ्याने शाळेच्या गणवेशातच शाळेत यावे असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार गणवेशाच्या रंगाचा हिजाब घालण्याची तयारी मुलीनी दर्शवली आहे. पण त्यांना महाविद्यालयात मात्र प्रवेश नाकारला जातोय. त्यामुळे यावरून आता वाद निर्माण झाला असून मंगळवारी याप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालय का निर्णय देतेय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami