शाळा पुन्हा गजबजणार! पहिली ते दहावीचे नियमित वर्ग सुरू करण्यास सरकारची परवानगी

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

मुंबई – कोरोना संसर्गाचा पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. मात्र आता संसर्ग कमी झाल्याने शाळेची घंटा पुन्हा एकदा वाजणार आहे. पहिली ते दहावीपर्यंत ऑफलाईन शाळा सुरू करणार असल्याचा निर्णय ठाकरेंच्या मंत्रिमंडळात घेण्यात आलाय. विशेष म्हणजे पहिली ते पाचवीपर्यंत शाळा सुरू कराव्यात की नाहीत, याबाबत अनेकांची दुमत होते. पण अखेर ठाकरेंच्या मंत्रिमंडळानं पहिली ते दहावीपर्यंत शाळा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवलाय. पण शाळा सुरू करत असतानाही विद्यार्थ्यांना कोविड 19 च्या सर्व नियमांचं पालन करावं लागणार आहे. विशेषतः त्याची जबाबदारी ही शिक्षकांवर अधिक असणार आहे.

Close Bitnami banner
Bitnami