संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 18 August 2022

शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांचे
फोटो संबंधित वर्गात लावले जाणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

* दांडी बहाद्दर शिक्षकांना शिस्त लावण्याचा ‘ फंडा “

पुणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील दांडीबहाद्दर शिक्षकांना शिस्त लावण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. दांडी बहाद्दर शिक्षकांची आता खैर नाही. शाळेत न जाताच सरकारचा गलेलठ्ठ पगार घेऊन कामावर दांडी मारणाऱ्या शिक्षकांना शिस्त लावण्यासाठी सरकारने आता कंबर कसली आहे. यापुढे प्रत्येक वर्गात त्या वर्गावर शिकविणाऱ्या शिक्षकाचे फोटो लावण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहेत. शिक्षकांप्रती विद्यार्थ्यांमध्ये आदराची भावना निर्माण व्हावी या हेतूने ‘आपले गुरूजी’ अभियान राबविण्यात येणार आहे. यामुळे आपल्यासाठी सरकारने कोणते शिक्षक नियुक्त केलेत, याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी आणि त्यातून बोगस शिक्षक कोण हे माहीत व्हावे यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे. यामुळे दांडी बहाद्दर शिक्षकांना चाप लागणार आहे.
सरकारी शाळामंधील अनेक शिक्षक पगार सरकारचा आणि काम मात्र दुसऱ्याचे असे करीत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत.ग्रामीण भागात तर जिल्हा परिषद शाळांमधील बहुतांश शिक्षक पुढाऱ्यांच्या मागे फिरताना शाळेकडे फिरकतच नसल्याचे आढळले आहे.काही ठिकाणी तर नाममात्र वेतनावर परस्पर आपल्या जागी एखाद्या व्यक्तीची शिक्षक म्हणून नियुक्ती करीत सरकारकडून मात्र गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या शिक्षकांची संख्याही अधिक आहे.त्यामुळे या शिक्षकांना शिस्त लागण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami