संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

शिंदे गटाकडून फोडाफोडीचे राजकारण, मनसेचा गंभीर आरोप

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- मनसे सरचिटणीस संजय नाईक यांनी शिंदे गट आमचे पदाधिकारी फोडत असल्याचा गंभीर आरोप लावला आहे. त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तुमचा गट मोठा करण्यासाठी दुसऱ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना आमिष दाखवून काय साध्य करू इच्छिता ? असा सवाल मनसे सरचिटणीस संजय नाईक यांनी केला आहे.
ते म्हणतात की, मी राहत असलेल्या भायखळा विधानसभेत आपल्या पक्षातील नवीन नेमणुका केलेल्या पदाधिकारी यांच्या केविलवाण्या परिस्थिती पाहून वाईट वाटते ते यासाठी इतर पक्ष्यांबाबत माहिती नाही पण माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिक आणि पदाधिकाऱ्यांच्या घरांमध्ये जावून तुमच्या पक्षामध्ये येण्यासाठी भिक मागून विनवणी करीत आहेत खोटी आमिष दाखवत आहेत हे दुर्दैवाने नमूद करावे लागत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami