संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 03 February 2023

शिंदे गटाचे आमदार 21 नोव्हेंबरला
कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. आज या दौऱ्याची तारीख ठरली असून 21 नोव्हेंबरला मुख्यमंत्री आपल्या सर्व आमदारांना घेऊन पुन्हा कामाख्या देवीचे दर्शन करण्यासाठी जाणार आहेत. तेथे एका खास पूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
शिंदे गटाचा हा एक दिवसीय हा दौरा असून गुवाहाटीच्या दौऱ्यासाठी पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. सर्व आमदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. सत्तांतराच्या काळात शिंदेंनी कामाख्या देवीच्या दर्शनाला जाऊन मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा दर्शनाला येईन, असे सांगितले होते. त्यामुळेच मुख्यमंत्री सर्व आमदारांना घेऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार असून दौऱ्यादरम्यान शिंदे गुवाहाटीचे मुख्यमंत्री, राज्यपाल, पोलीस आयुक्त अशा महत्त्वाच्या व्यक्तींना भेटणार आहेत. सत्तांतराच्या काळात शिंदे यांना ज्या व्यक्तींनी मदत केली त्यांना भेटणार आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातून बंडखोरी केली आणि तब्बल 40 शिवसेना आमदारांना घेऊन सत्तेबाहेर पडले. त्यांच्यासह मित्रपक्ष आणि अपक्ष आमदारांनी देखील सत्तेतून काढता पाय घेतला होता. हे सर्व आमदार गुवाहाटीच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबले होते. शिंदेसह आमदारांनी शक्तिपीठ असलेल्या कामाख्या देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि तिथे पूजाही केली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami