संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

शिंदे गटाच्या मेळाव्यातील भाषणथेट लोकल मधील टीव्ही स्क्रीनवर !

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

*ठेकेदाराला दंडाचा बडगा
*रेल्वे प्रशासनाची कारवाई

मुंबई – मुंबईतील लोकलमध्ये बीकेसी वरील शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यातील भाषण थेट एलईडी टिव्हीवर दाखविण्यात आले होते. याबाबत सोशल मीडियावरुन अनेकांनी तक्रारी दाखल केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने याची दखल घेतली आहे.त्यानंतर कारवाई करताना संबंधितांना दंड ठोठावण्यात येणार आहे,अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनतर्फे देण्यात आली आहे.
परवानगी नसतानाही शिंदेंच्या सभेचे थेट प्रक्षेपण लोकलमध्ये जवळपास १० ते १५ मिनिटे दाखवण्यात आले होते.पश्चिम रेल्वेच्या लोकल डब्यात जाहिराती प्रदर्शित करण्यासाठी एलईडी टिव्ही बसवण्यात आले आहेत.त्यावर बीकेसीतील शिंदे गटाच्या दसरा सभेचे थेट प्रक्षेपण करण्यात आल्याने काही प्रवाशांनी पश्चिम रेल्वेला ट्विट करुन याची माहिती दिली होती.त्यानंतर रेल्वे प्रशासनाने कठोर पावले उचलत तपास केला असता कंत्राटदाराने कराराचा भंग करुन हे प्रक्षेपण केल्याचे समोर आले आहे.शिंदे यांच्या सभेच्या प्रक्षेपणाची परवानगीही रेल्वेकडून देण्यात आली नव्हती. याप्रकरणी कंत्राटदाराकडून खुलासा मागवण्यात आला आहे.त्याचबरोबर आता कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami