संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

शिंदे गटाला चिन्ह मिळाल्यानंतर ढाल तलवारीची पूजा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

डोंबिवली: – अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणुक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं. ज्यानंतर आयोगाने शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव दिले. शिंदे गटाला ‘ढाल तलवार’ हे चिन्ह दिले आहे. ढाल तलवार चिन्ह मिळताच शिंदे समर्थकांनी डोंबिवलीत ढाल तलवारीची पूजा केली. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी जय श्रीराम च्या घोषणा दिल्या. गणपतीच्या मंदिरात जाऊन शिंदे समर्थकांनी साकडे घातले. शिंदे समर्थकांनी याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करत शक्ती प्रदर्शन केले.
दरम्यान शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ट्विट केले आहे. ते म्हणतात की, आम्हीच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्वाच्या विचारांचे खरे वारसदार.. सज्जनांच्या रक्षणासाठी बनूनी #ढाल, दुर्जनांच्या संहारासाठी हाती धरू #तलवार.. #बाळासाहेबांचीशिवसेना, निशाणी : #ढालतलवार. शिंदे गटाने या नव्या नावासह चिन्हाचे पोस्टर जाहीर केले आहे. यानंतर आता शिंदे गटाने आपला नवा टिझर जारी केला आहे. नावात बाळासाहेब, गाण्यात धर्मवीर असा हा टीझर आहे. सात सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये शिंदे गटाच्या पक्षाचे नाविन नाव आणि चिन्ह दिसत आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये जे गाणे वापरण्यात आले आहे त्यात धर्मीवर आनंद दिघे यांचे नाव ऐकायला मिळत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami