मुंबई – महाविकास आघाडी सरकारने आरे कारशेडवर घातलेली बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठवली आहे. त्यामुळे आता कारशेड आरेतच होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी यासंदर्भातील आदेश जारी केले.
फडणवीस सरकारच्या काळात रातोरात झाडे कापून या प्रकल्पाचे काम पुढे रेटण्यात आले होते. परंतु महाविकास आघाडी सरकारने कारशेडच्या या प्रकल्पावर स्थगिती आणली होती. त्यामुळे मागच्या अडीच वर्षांपासून कारशेडचे काम बंद होते. आता शिंदे-फडणवीस सरकारने सत्ता हाती घेताच हा निर्णय बदलण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी त्यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आता मुंबईकर आणि पर्यावरणवादी अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. आता यावर आदित्य ठाकरे आणि शिवसेना कितपत आक्रमक भूमिका घेते, हे पाहावे लागले.