संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

शिक्षक परिषदेने नागो गाणारांना उमेदवारी दिल्याने भाजपची गोची

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नागपूर – भाजपसोबत कोणतीही चर्चा न करता शिक्षक परिषदेने विद्यमान आमदार नागो गाणार यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्यावरून भाजपची मोठी कोंडी झाली आहे. या मतदारसंघातून नव्या चेहऱ्याला संधी मिळेल, अशी अपेक्षा इच्छुकांना होती. मात्र गाणार यांनाच उमेदवारी जाहीर केल्यामुळे आणि मतदार नोंदणी सुरू झाल्यामुळे ऐनवेळी दुसरा उमेदवार कसा द्यायचा असा प्रश्न भाजपसमोर निर्माण झाला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे यावेळी नागपूर शिक्षक मतदार संघासाठी भाजपचे अनेक नेते इच्छुक आहेत.
शिक्षक आमदार गाणार यांचा कार्यकाळ ७ फेब्रुवारी २०२३ ला संपणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी जानेवारीत नागपूर शिक्षक मतदार संघातून निवडणूक होण्याची शक्यता आहे. यावेळी भाजप किंवा शिक्षक परिषद नव्या चेहऱ्याला संधी देईल, असे मानले जात होते. भाजपने यापूर्वी दोनदा गाणार यांना पाठिंबा दिला होता. मात्र यावेळी ते स्वतःचा उमेदवार देण्याच्या विचारात होते. महाराष्ट्र समन्वयक कल्पना पांडे आणि पूर्व विदर्भाचे समन्वयक अनिल शिवणकर यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे यावेळी भाजप निवडणूक लढवण्याच्या विचारात आहे. त्याबाबत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे संघाशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत. मात्र शेवटच्या क्षणी उमेदवार दिल्यास भाजपसाठी तो आत्मघात ठरू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे गाणार यांनी २०११ मध्ये माध्यमिक शिक्षक मतदार संघाच्या गडाला भगदाड पाडून विजय मिळवला होता. त्यानंतर २०१७ मध्येही ते विजयी झाले होते. तथापि यावेळी त्यांच्या उमेदवारीवरून भाजपची मात्र कोंडी झाली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami