संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

शिक्षण आयुक्त दीर्घ रजेवर! शिक्षणाचा कारभार वाऱ्यावर?

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – राज्याच्या शिक्षण विभागाचा गाडा चालवणारे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे ४० दिवसांच्या प्रदीर्घ रजेवर गेले आहेत. त्यामुळे त्यांचा अतिरिक्त कार्यभार क्रीडा आयुक्तांकडे दिला आहे. हीच परिस्थिती प्राथमिक शिक्षण संचालनालय, राज्य शिक्षण परिषद आणि इतर ठिकाणी आहे. महत्त्वाचा निर्णय घेताना प्रभारींना मर्यादा असतात. यामुळे आता राज्याचा शिक्षणाचा कारभार एक प्रकारे प्रभारींवर म्हणजे वाऱ्यावर आहे.

राज्य शिक्षण विभागाचे मुख्यालय पुण्यातील सेंट्रल बिल्डिंगमध्ये आहे. तेथून राज्यातील शिक्षण विभागाचे कामकाज चालते. शिक्षण आयुक्त हे त्यात अतिशय महत्त्वाचे पद आहे. मात्र शिक्षण आयुक्त दीर्घ रजेवर गेले आहेत. त्यांनी आपला कार्यभार क्रीडा आयुक्तांकडे सोपवला आहे. याशिवाय शिक्षण संचालनालय, राज्य शिक्षण परिषद आणि योजना संचालनालयाला पूर्णवेळ संचालक नाहीत. त्यामुळे राज्याचा शिक्षण विभाग प्रभारींवर अवलंबून आहे. प्रभारी अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्णय घेण्याची मुभा नसते. त्यामुळे एखादी अडचण आली तर काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्राथमिकचे संचालक दिनकर पाटील सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याचा अतिरिक्त कार्यभार उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांच्याकडे दिला आहे. असे असताना मांढरे रजेवर गेल्यामुळे त्यांचा अतिरिक्त कार्यभार क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे दिला आहे. राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगतापांच्या सेवानिवृत्तीनंतर या विभागाचा कार्यभार उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याकडे दिला आहे. या सर्व परिस्थितीमुळे राज्याच्या संपूर्ण शिक्षण विभागातच प्रभारी राज सुरू आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami