संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

शिराळ्यातील खवरेवाडी शिवारात तब्बल पाच गव्यांचे दर्शन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सांगली – शिराळा तालुक्यातील खवरेवाडी येथील शिवारात काल सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास लहानमोठ्या तब्बल पाच गव्यांचे दर्शन घडल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. या परिसरात अशा प्रकारे रानगवे येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

काल रात्री खवरेवाडीतील भोळ्याचा माळ शिवारात ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब गायकवाड, यशवंत खोत, जालिंदर पाटील, अरुण खोत, संदीप माने आणि लालासाहेब खवरे, आदिजण गेले असता त्यांना हे गवे दिसले. हे गवे वारणा नदी पार करून शाहुवाडी तालुक्यात गेल्याचे या शेतकऱ्यांनी पहिले. बिबट्याबरोबर आता गवे येऊ लागल्याने इथले शेतकरी भयभीत झाले आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami