संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

शिरुरमध्ये भाजपचा खासदार करण्याचे केंद्रीय मंत्र्यांचे सूतोवाच

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

शिरुर – पुणे जिल्ह्यातील शिरुरमधून खासदार हा काम करणारा असावा, आणि तो भाजपचा असावा असे म्हणत भाजपच्या केंद्रीय मंत्री रेणुका सिंग यांनी शिंदे गटातील आढळराव पाटील यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रेणुका सिंग सध्या भाजपच्या ‘केंद्रीय नेता लोकसभा मतदारसंघ प्रवास योजना’ अंतर्गत ३ दिवसीय शिरुर लोकसभा मतदारसंघ दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्या काल बुधवारी मंचर येथील पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

यावेळी रेणुका सिंग पुढे म्हणाल्या की, शिरुर लोकसभा मतदार संघात भाजपची ताकत वाढावी यासाठी केंद्रीय नेतृत्वाने आपल्यावर जबादारी दिली आहे.त्यासाठी ३ दिवस या मतदारसंघात फिरत आहे. स्थानिक माजी खासदार कोणत्या गटाचा किंवा कोणत्या पक्षाचा याबाबत आपल्याला काही म्हणायचे नाही. ते आमच्या सोबत युतीत होते, पण तरीही आता दिवस बदलले आहेत.आम्ही आमची ताकद अजमावणार आहोत. राष्ट्रवादीची कथणी आणि करणी वेगळी आहे. त्यामुळे यापुढचा खासदार काम करणारा असावा आणि भाजपचा असावा, असेही सिंग म्हणाल्या.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami