संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोकरुड- रांगणा किल्ल्यावरुन शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ओमकार भिमराव पाटील (19) असे या मृत तरुणाचे नाव आहे. पणुब्रे वारुण (ता.शिराळा) येथील युवकांसोबत शिवज्योत आणण्यासाठी ओमकार रांगणा किल्ल्यावर गेला होता. या घटनेची नोेंद भुदरगड पोलिसांत करण्यात आली आहे.
भुदरगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पणुब्रे वाररूण ता. शिराळा येथील अंदाजे 30 ते 40 जण 19 फेब्रुवारीला होणार्या शिवजयंती निमित्त शिवज्योत आणण्यासाठी बुधवारी रांगणा किल्ल्यावर आले होते. काल किल्ल्यावरील परिसरासह तलावाची स्वच्छता करताना ओमकार अचानक बुडून बेपत्ता झाला. त्याचा शोध कोल्हापूर येथील आपत्कालीन व्यवस्थापनाकडून घेण्यात
येत होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami