संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

शिवभक्तांची दुचाकी वरंध घाटात २०० फुट दरीत कोसळली, तिघे जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

रायगड – पुणे जिल्ह्यातील भोर येथून रायगडकडे शिवज्योत आणण्यासाठी मोटर सायकलवरुन ट्रिपल सिट गेलेल्या शिवभक्तांच्या मोटरसायकलला आज शनिवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या शिवभक्तांची मोटरसायकल सुमारे २०० फुट दरीत कोसळली. यात तिघे जण जखमी झाले.

आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सवाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळाले. मात्र ठिकठिकाणी शिवरायांना वंदन केले जात असताना आज पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास भोर येथून रायगडकडे शिवज्योत आणण्यासाठी मोटर सायकलवर ट्रिपल सिट येणाऱ्या शिवभक्तांच्या मोटरसायकलला वरंध घाटात कावळे किल्ल्याजवळ अपघात झाला. त्यांची मोटरसायकल सुमारे २०० फुट दरीत कोसळली. या अपघातामध्ये तिघेजण जखमी झाले. केतन देसाई (२३), प्रथमेश गरुड (२५) आणि किरण सुर्यवंशी (२०) अशी जखमींची नावे असून ते भोर तालुक्यातील भांगेली येथील रहिवाशी आहेत. त्यापैकी दोघांवर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर एकाला प्राथमिक उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. महाड औद्योगिक वसाहत पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी बचाव कार्य करीत जखमींचे प्राण वाचवले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami