संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 31 March 2023

शिवभक्तांच्या टेम्पोला कंटेनरची
जोरदार धडक! ३५ जण जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे- राज्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. अशातच मुंबई- बंगळुरू हायवेवर शिवभक्तांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. यामध्ये ३५ जण जखमी झाले. यातील १० जण गंभीर जखमी असून बाकीचे किरकोळ जखमी आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. कात्रज देहूरोड बायपासच्या ताथवडे येथे एका टेम्पोचा अपघात झाला. मुंबई- बंगळुरू हायवेवर पोहचले असता टेम्पोला मागून कंटेनरची जोरात धडक बसली. यामध्ये शिवभक्त जखमी झाले. मल्हारगड ते लोणावळा शिलाटणे येथे शिवज्योत घेऊन ते निघाले होते. यावेळी हा दुर्दैवी अपघात झाला. सदर घटनेमुळे याठिकाणी मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या