संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून किती दिवस ब्लॅकमेल करणार !

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

रत्नागिरी – एकनाथ शिंदे गटात सामील झालेले शिवसेना नेते रामदास कदम हे आता अक्रमक झाले असून यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. रामदास कदम यांनी म्हटले आहे की, शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून किती दिवस राज्याला ब्लॅकमेल करणार आहात. उद्धव ठाकरे यांनी त्यांची भावनात्मक डायलॉ़गबाजी थांबवावी.सत्तेसाठी शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसलात, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आठवण झाली का?

पुढे बोलताना रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरेंना जे काही मिळाले ते शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून मिळाले. आदित्य ठाकरेंना जे पक्षात, सत्तेत जे स्थान मिळाले ते उद्धव ठाकरेंचा मुलगा म्हणून मिळाले आहे. पक्ष संघटना कुणी वाढवली? पक्ष संघटना आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांनी वाढवली आहे.आता जाणीव झाल्यानंतर सगळ्या शिवसेना नेत्यांच्या गाठीभेठी सुरु झाल्या आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर मीपण राज्याचा दौरा करणार आहे. खरे सत्य जनतेला कळेल. सत्तेत असताना गेली अडीच वर्षात काय झाले होते, नेमके काय घडले आहे, ही वस्तुस्थिती राज्यातील जनतेला मी सांगणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami