संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 19 August 2022

शिवसेना विधिमंडळ कार्यालय सील; अधिवेशनाआधीच नवी ठिणगी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना हा पक्ष आपलाच असल्याचा दावा केला आहे. यावरून कायदेशीर वाद सुरू असतानाच विधिमंडळातील शिवसेनेचे कार्यालय सील करण्यात आल्याची माहिती आज सकाळी समोर आली. त्यामुळे या कार्यालयातील कामावर आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना सकाळी कार्यालयाबाहेरच थांबावे लागले. शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालय यांनी कळविल्यानुसार दालन बंद ठेवण्यात आलेलं आहे, अशी नोटीस दरवाजावर लावण्यात आली आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे गटाकडून पक्ष कार्यालय बंद करण्याचे पत्र दिल्यानंतर हे कार्यालय बंद केल्याचे कळते. कारण सुनील प्रभू यांनी शिवसेनेकडून असे पत्र दिले नसल्याचा खुलासा केला. त्यामुळे शिवसनेची कोंडी करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे दिसून येते. आता यावरून पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शिवसेनेने पहिल्यांदाच हा ऐतिहासिक बंड पाहिला. एकनाथ शिंदे यांनी दोन तृतीयांश आमदारांना घेऊन बंड केले आणि भाजपासोबत सरकार स्थापन केले. त्यातच आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची सुरुवात होण्याआधीच सेनेचे विधिमंडळ कार्यालय सील केल्याने चर्चांना उधाण आले. कार्यालयात शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक होणार होती. यात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा केली जाणार होती. मात्र त्यापूर्वीच कार्यालय सील करण्यात आले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami