गुवाहाटी – शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटाची गुवाहाटीमध्ये बैठक होणार आहे. दुपारच्या सुमारास होणाऱ्या या बैठकीत काय निर्णय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका कार्यक्रमात बोलताना शिवसेनेच्या जीवावर मोठ्या झालेल्या या बंडखोर मंत्र्यांची मंत्रिपदे २४ तासांत जातील. तशी कारवाई सुरू आहे. पण आपल्याकडे नियम असतात, कायद्याने काम करावे लागते. इथे कायद्याचे राज्य आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत. ठाकरे गटाच्या या निर्णयामुळे आता शिंदे गटामध्ये नाराजीचं वातावरण आहे. अशातच आता त्यांची बैठक होणार आहे.