संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

शिवसेनेवर शेलार यांच्या ट्वीटने निशाणा! पब, पार्टीवाली पेंग्विन सेना असा उल्लेख

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे मुंबई महानगर पालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीने जोर लावला आहे. ठाकरेगट आणि भाजपाकडून एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. गुजरातला मुंबईतील सर्व सोयीसुविधापळवून नेण्याचा डाव भाजपाचा आहे, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात येते. शिवसेनेच्या टीकेचा भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्वीट करत निशाणा साधला आहे.त्यांनी ट्वीट मध्ये शिवसेनाचा उल्लेख पब, पेग आणि पार्टीवाली पेंग्विन सेना असा केला आहे.

शेलारांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, देशातील सर्वात जुने विशेष आर्थिक क्षेत्र असलेल्या अंधेरीच्या सिप्झमध्ये भारत सरकारकडून २०० कोटी रुपये खर्च करून विशेष केंद्रीकृत सुविधा (सीएफसी) उभारण्यात येत आहे. याच्या माध्यमातून ५ लाख रोजगार आणि ३० हजार कोटींच्या निर्यातीचे उदिष्ट ठेवण्यात आलं आहे. याची नुकतीच पायाभरणी झाली आहे. दुसऱ्या एका ट्वीटमध्ये त्यांनी पुढे म्हटलं की, बीकेसीत भूमिगत बुलेट ट्रेन टर्मिनस आणि त्यावर आयएफएससी उभे राहणार आहे. सोबतच ७ मेट्रो धावू लागतील. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आर्थिकदृष्ट्या बलवान होणार! आमचं ठरलंय! पण पब, पेग आणि पार्टीवाल्या पेंग्विन सेनेला मुंबईतून सगळे गुजरातला जाते, असे ध्वनिप्रदूषण करण्याची नशाच चढली आहे अशी टीका आशिष शेलारांनी केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami