पुणे : काही दिवसांपूर्वी त्यांनी महिला पत्रकाराशी बोलताना “तू आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलतो” असे वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर मोठा वाद झाला होता. आपल्या वादग्रस्त विधानांनी कायम चर्चेत राहणाऱ्या संभाजी भिडें यांचे पुन्हा एक विधान सध्या चर्चेत आहे. महाराजांचा जन्म हा शिवनेरीवर झाला आहे. त्यामुळे त्यांची जयंती हिंदू पंचांगाच्या तिथीनुसारच साजरी झाली पाहिजे असे म्हणत अरबी समुद्रात त्यांचे स्मारक होणार आहे. या समुद्रातील स्मारकाचा आणि शिवछत्रपतींच्या आयुष्याचा काहीही संबंध नाही. सरकारने हे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नये, अशी वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील जुन्नरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले आहे.
ते पुढे म्हणाले, आमची राज्य सरकारला विनंती आहे. शिवछत्रपतींना इंग्रजांच्या प्रसूतीगृहातून बाहेर काढा. महाराजांचा जन्म हा शिवनेरीवर झाला आहे. त्यामुळे त्यांची जयंती हिंदू पंचांगाच्या तिथीनुसारच साजरी झाली पाहिजे. शिवरायांचा राज्याभिषेक झाल्यानंतर हिंदू स्वराज्य स्थापन झाले आणि ‘शिवशक’ सुरू झाला. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि देशाच्या पंतप्रधानांनी हे लक्षात घ्यावे, ही स्वाभिमान ठासून भरलेला असा हा ‘शिवशक’ आहे. त्यामुळे अखिल भारतीय स्तरावर तो पोहोचला पाहिजे”, असेही ते म्हणाले.आज त्यांचे नको इतके पुतळे उभारले जात आहेत. अरबी समुद्रात त्यांचे स्मारक होणार आहे. या समुद्रातील स्मारकाचा आणि शिवछत्रपतींच्या आयुष्याचा काहीही संबंध नाही. या स्मारकावर कोट्यवधी रुपये खर्च होणार आहे. सरकारने हे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नये”, अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी दिली.