संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

शीना जिवंत असल्याचा इंद्राणीचा दावा; चौकशीसाठी सीबीआयने मागितला वेळ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- राज्यातील प्रचंड गाजलेल्या शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने शीना बोरा ही जिवंत असल्याचा दावा केला होता. यासंदर्भात इंद्राणी मुखर्जीने सीबीआयला एक पत्र पाठवले होते. याशिवाय, इंद्राणीने सीबीआयच्या विशेष कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे सीबीआयला आज निर्देश दिले होते. मात्र मात्र सीबीआयने न्यायालयात आरोपी इंद्राणी मुखर्जीच्या याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ मागितल्याने न्यायालयाने त्यांना दोन आठवड्यांचा वेळ मंजूर केला आहे. आता या प्रकरणात पुढील सुनावणी 18 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

तुरुंगातील एका कैद्याने शीनाला जम्मू-काश्मीरमध्ये भेटल्याचे सांगितले होते, असा दावा इंद्राणी मुखर्जीने केला होता. सीबीआयला एक पत्र पाठवत शीना बोरा काश्मीरमध्ये वास्तव्य करत असून यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी केली होती. याशिवाय, इंद्राणीने सीबीआयच्या विशेष कोर्टात याचिका दाखल केली होती. आता सीबीआयने आरोपी इंद्राणी मुखर्जीच्या अर्जावर उत्तर दाखल करण्यासाठी विशेष सीबीआय न्यायालयाकडे दोन आठवड्यांचा अवधी मागितला आहे.

मात्र इंद्राणी मुखर्जीच्या खळबळजनक दाव्याने शीना बोरा हत्याकांडात नवीन वळण येण्याची शक्यता आहे. दरम्यान, इंद्राणी मुखर्जीने जामिनासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र गेल्याच महिन्यात हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami