संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 21 May 2022

शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्समध्ये ३५० अंकांची उसळी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

कालच्या व्यवहारात सलग दुसऱ्या दिवशी बाजारात विक्री दिसून आली. काल म्हणजेच १२ एप्रिल रोजी सेन्सेक्स-निफ्टी ०.६० टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाला. तर शेअर मार्केटसाठी आजचा दिवस चांगला राहिला. पहिल्याच सत्रात सेन्सेक्सने ३५० अंकांची उसळी घेतली. तर निफ्टीमध्येदेखील १०० अंकांची वाढ झाली.

आज शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स ३५० अंकांच्या वाढीसह ५८,९१०.७४ अंकांवर पोहोचला. तर निफ्टी १०० अंकांच्या वाढीसह १७,६५९ अंकांवर पोहोचला. मंगळवारी सेन्सेक्स ५८,५७६.३७ आणि निफ्टी १७,५३०.३० अंकांवर बंद झाला होता.

आज टाटा स्टीलचे शेअर्स टॉप गेनवर राहिले. शेअर मार्केटमध्ये तेजी आल्याने गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा फायदा झाला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami