मुंबई – जागतिक बाजारातील मंदीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी शेअर बाजारातून एक चांगली बातमी आली. आज सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक हिरव्या चिन्हात उघडले. सुरुवातीला सेन्सेक्स ५४,२१०.१० वर व्यवहार करत होता, पुढे त्याचा वेग आणखी वाढला. तर, ५० अंकांचा निफ्टी १६,१२८.२० वर सुरू झाला.
सकाळी प्री ओपन सत्रामध्ये सेन्सेक्समधील ३० पैकी २५ समभाग हिरव्या चिन्हांसह व्यवहार करत होते. यावेळी बजाज फिनसर्व्हच्या शेअरमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. दरम्यान, मंगळवारी शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण दिसून आली होती. विक्रीच्या दबावाखाली सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला होता. व्यवहाराच्या अखेरीस ३० अंकांचा सेन्सेक्स ५०८.६२ अंकांनी घसरला आणि ५३,८८६.६१ अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५७.७० अंकांनी घसरून १६,०५८.३० वर बंद झाला होता.