संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 18 August 2022

शेकापचे कोषाध्यक्ष राहुल पोकळेयांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे : शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्र कोषाध्यक्ष राहुल पोकळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. पुणे शहरातील धायरी येथील राहुल पोकळे हे गेल्या २० वर्षांपासून पुरोगामी चळवळीत काम करत आहेत. याशिवाय ते सर्वसामान्यांचे प्रलंबित प्रश्न घेऊन सामाजिक आंदोलनातून भूमिका घेत रस्त्यावर उतरले आहेत. राहुल पोकळे यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

“पुरोगामी विचारांच्या चळवळीची आज गरज आहे. सनातनी विचारांना रोखण्याची ताकद पुरोगामी पक्षात आहे, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.” असे मत राहुल पोकळे यांनी यावेळी व्यक्त केले. येणाऱ्या काळात असंख्य कार्यकर्त्यांच्या जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम लवकरच प्रभागात घेणार असल्याचे सांगितले. राष्ट्रसेवा समूह या संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांचे कार्य सर्वांना परिचित आहे. सामुदायिक विवाह, ३०० गावात संविधान जनजागृती यात्रा, प्रबोधन शिबिरे इत्यादी अनेक उल्लेखनीय कामे त्यांनी केलेली आहेत. महिला बचत गटांचे विस्तृत जाळे, युवकांचे असलेले संघटन, राज्यभरात असलेले काम, संघटनाचा राष्ट्रवादीला फायदा होईल.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्याने पक्ष संघटन त्यांचा कसा उपयोग करून घेते हे पहावे लागेल. येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत राहुल पोकळे यांचा पक्षाला फायदा होण्याची शक्यता आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami