संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 21 May 2022

शेख मोहम्मद बिन झायेद बनले यूएईचे नवे अध्यक्ष

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

दुबई- संयुक्त अरब अमिरातचे अध्यक्ष शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांचे काल निधन झाले. त्यानंतर आज यूएईच्या नव्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान (61) हे यूएईचे पुढील अध्यक्ष असतील.  देशाचे ते तिसरे राष्ट्रपती असणार आहेत. संयुक्त अरब अमिरातचे अध्यक्ष शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांचे काल निधन झाले. नाहयान हे 73 वर्षांचे होते. नाहायन यांच्या निधनाबद्दल सरकारने 40 दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. याशिवाय देशातील सर्व खासगी आणि सरकारी क्षेत्रात तीन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
शेख खलिफा बिन झायेद अल नाहायान यांनी 3 नोव्हेंबर 2004 पासून देशाचे राष्ट्राध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक म्हणून पदभार स्वीकारला. त्याआधी त्यांचे वडील शेख झायेद बिन सुलतान अल नाहयान राष्ट्राध्यक्ष होते. 1948 मध्ये जन्मलेले शेख खलिफा हे यूएईचे दुसरे राष्ट्रपती आणि अबू धाबीचे 16 वे शासक होते. आपल्या कार्यकाळात शेख खलिफा यांनी यूएई आणि अबूधाबीच्या
प्रशासनाची पुनर्रचना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि अनेक सुधारणा अंमलात आणल्या होत्या.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami