शोपियातील चकमकीत लष्करच्या कमांडरसह २ अतिरेक्यांना कंठस्नान

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

श्रीनगर – दक्षिण काश्मीरमधील शोपियात सुरक्षा दलाचे जवान आणि अतिरेक्यांमध्ये रात्री उशिरा चकमक झाली. त्यात लष्कर-ए-तोयबाचा स्वयंघोषित कमांडर इश्फाक डार उर्फ अबू अक्रम याच्यासह २ अतिरेकी ठार झाले. त्यांच्याकडून सुरक्षा दलाने २ एके-४७ रायफली, काडतुसे आणि स्फोटके जप्त केली, अशी माहिती पोलिस प्रमुख विजय कुमार यांनी दिली.

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अतिरेकी कारवाया सुरू आहेत. त्यात २०१७ मधील काश्मीर खोऱ्यातील सर्वाधिक अतिरेकी कारवायांमध्ये अबू अक्रमचा सहभाग होता. त्यामुळे तेव्हापासून सुरक्षा दलाचे जवान त्याच्या मागावर होते. परंतु तो सापडत नव्हता. मात्र काल रात्री सुरक्षा दलाने हाती घेतलेल्या झडती मोहिमेत शोपिया येथे झालेल्या चकमकीत २ अतिरेकी ठार झाले. त्यात आक्रमचा समावेश असल्यामुळे सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. काही दिवसांपूर्वीच अनंतनागमध्ये लष्कर-ए-तोयबाचा मोरक्या अबू हुरैर ठार झाला होता.

Leave a Comment

Your email address will not be published.

Close Bitnami banner
Bitnami