संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 08 August 2022

श्रीकृष्ण जन्मभूमी विवाद
18 जुलैला पुढील सुनावणी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मथुरा – मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही इदगाह मशीद वादावर आज सोमवारी होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हत्येबाबत मथुरा बार असोसिएशनने शोकसभेचे आयोजन केले होते. त्यामुळे आज या प्रकरणावर सुनावणी होऊ शकली नाही. आता यावर 18 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. वकील महेेंद्र प्रताप सिंग यांनी याचिका दाखल करत श्रीकृष्ण जन्मभूमी परिसरातून शाही इदगाह मशीद हटविण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यांच्या याचिकेवर आज जिल्हा न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार होती. सिंग यांनी इदगाहचा पुरातात्विक सर्वेे आणि कमिश्‍नर नियुक्त करावा, अशी मागणीही केली आहे. याबाबत महेंद्र प्रताप यांनी शाही इदगाह मशीद कमिटीच्या आक्षेपावर आपला आक्षेप नोंदवला होता. त्यावर मुस्लीम बाजूच्या वकिलांनी न्यायालयाला विनंती केली की त्यांना हिंदू बाजूच्या आक्षेपाची प्रत नुकतीच मिळाली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami